millets रॅली चे लक्ष वेधणारा मिलेट मॅन

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांचे तर्फे आज दिनांक २३.०२.२०२३ रोजी उस्मानाबाद शहरामध्ये मिलेट रॅली चे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता या रॅलीमध्ये नागरिकांचे लक्ष वेधून घेण्याकरिता जिप्सी तृणधान्यांनी सजवून आणलेली होती तसेच छोटे ट्रॅक्टर सुद्धा पौष्टिक तृणधान्याच्या लाईव्ह सँपलनी सजवून आणलेले होते या रॅलीचे विशेष आकर्षण म्हणून मिलेटमॅन बनलेले श्री राहुल जाधव हे होते. राहुल जाधव हे परंडा तालुक्यामध्ये कृषी सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. या रॅली मध्ये त्यांनी मिलेटमॅन साकारला होता व तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →