आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे बीबी ता फलटण येथे महिला मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र शासन कृषी विभाग फलटण मा. उपविभागीय कृषी अधिकारी फलटण .मा.तालुका कृषी अधिकारी फलटण,यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषी अधिकारी तरडगाव मा. कु.पूजा दुदुस्कर मॅडम , कृषीपर्यवेक्षक श्री शिंगाडे, सौ रूपाली महिपत बोबडे, सरपंच- बीबी यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवार दि. 23/1/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत महिला मेळावा घेतला ,कृषी सहाय्यक सौ .जाधव पी.व्ही. यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व मा.अध्यक्ष सरपंच मॅडम व मंडळ कृषी अधिकारी तरडगाव आणि ग्रामपंचायत सदस्य ,कृषी पर्यवेक्षक तरडगाव२ -श्री शिंगाडे जी.जे. ग्रामसेवक सौ चव्हाण मॅडम यांनी सरस्वती पूजन केले, मंडळ कृषी अधिकारी तरडगाव यांनी बाजरीतील आहारातील महत्त्व व त्यांचे उत्पादन क्षेत्र वाढवणे रोजच्या आहारात वेगवेगळे पदार्थ तयार करून लहानांपासून मोठ्यापर्यंत वापर करणे याबाबत माहिती दिली. कृषी सहाय्यक सौ जाधव पी व्ही यांनी लहान मुलांना आवडतील अशा बाजरीच्या रेसिपी सांगितल्या सर्व तृणधान्याची क्षेत्र वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे . तसेच बाजरी बरोबर भगर,नाचणी, ज्वारी ,कुळीथ इत्यादी तृणधान्याचा थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात वापर करावा असे सांगून सर्वांच्या आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →