भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्राने 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्ट्टीक तृणधान्य वर्ष घोषित केलेले आहे. याचाच एक भाग म्हणून माननीय विभागीय आयुक्त कोकण विभाग तथा जिल्हाधिकारी रायगड डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष 2023 रायगड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून जिल्ह्यातील अतिदुर्गम गावापासून ते पनवेल, नवीमुंबई या मोठ्या शहरापर्यंत पौष्ष्ट्टक तृणधान्याची लागवड, त्याची प्रक्रिया व आहारातील महत्व याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. याबाबत वर्तमानपत्रात प्रसिद्ध बातमी.