आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मौजे- बाळु पाटलाचीवाडी ता खंडाळा येथे हुरडा पार्टीचे आयोजन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग, तालुका कृषि अधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत बाळुपाटलाचीवाडी यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता मौजे- बाळु पाटलाचीवाडी येथील चैतन्य दूध डेअरी शेजारी श्री. सतीश आनंदा धायगुडे यांच्या शेतावर आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षी निमित्ताने हुरडा पार्टी चे नियोजन केले होते. या हुरडा पार्टी च्या निमित्ताने व पौष्टिक तृणधान्य या बाबत श्री. राजेश कुलकर्णी- मंडळ कृषि अधिकारी लोणंद यांनी मार्गदर्शन केले. श्री. शिवाजी शेंडगे-कृषि पर्यवेक्षक लोणंद-1 यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या वर सविस्तर माहिती दिली. या वेळेस श्री. नवनाथ धायगुडे पाटील- सरपंच, बा. पा. वाडी, श्री. अमोल यादव- उपसरपंच, बा. पा. वाडी, ग्रामपंचायत बा. पा. वाडीचे सर्व सदस्य, श्री. ज्योतिराम दगडे- तलाठी, ग्रामपंचायत पाडेगाव, बाळूपाटलाचीवाडी गावातील सर्व शेतकरी, युवक मंडळा चे सदस्य, लोणंद मंडळ मधील कृषि सहाय्यक सर्वश्री संतोष खुटवड, सुरेश डोईफोडे, सुशील मोहिते, हरीश लांडगे, सुभाष जाधव,आत्मा BTM समीर चव्हाण श्रीमती- खरात मॅडम इत्यादीउपस्थित होते. श्री. अशोककुमार आघाव- कृषि सहाय्यक – बाळूपाटलाचीवाडी यांनी हुरडा पार्टी यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न घेऊन हुरडा पार्टी यशस्वी केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →