आंतरराष्ट्रीय पोष्टीक तृणधान्य वर्षा 2023 निमित्त मौजे माचूतर ता महाबळेश्वर जि सातारा येथे पौष्टिक तृणधान्याचे महत्व व जनजागृती ,प्रभात फेरीचे आयोजन

महाराष्ट्र शासन कृषी विभागा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय महाबळेश्वर मौजे माचूतर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 कार्यक्रमाचे आयोजन मंडळ कृषि अधिकारी श्री बुधावले व श्री राऊत कृषि पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला. सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माचूतर यांचा सहभाग घेऊन घेण्यात आला. माचूतर येथे आयोजित कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य चंद्रकांत आखाडे यांनी पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व व आपल्या दैनंदिन जिवनात रोजचा आहार कसा आसावा हे सांगितले. श्री. गोसावी कृषी सहायक यांना बाजरीचे आहारातील महत्व व बाजरीचे विविध पदार्थ तसेच बाजरी प्रक्रिया उद्योग या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी यांची शिक्षकांच्या मार्गदर्शना नुसार प्रभात फेरी काढण्यात आला. या प्रभात फेरीत गावातील नागरीकांच्यात जागृती करण्यासाठी पौष्टिक तृणधान्य विषयावर घोषणा देण्यात आल्या.कार्यक्रमाच्या शेवटी श्री. अतुल गोसावी कृषी सहायक माचूतर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →