आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य २०२३ वर्षानिमित्त गोटे ता. कराड येथे तृणधान्याचे महत्व या विषयावर मार्गदर्शन शिबिर

सदर कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय कृषि अधिकारी कराड व तालुका कृषि अधिकारी कराड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्राथमिक शाळा गोटे येथे आयोजित करण्यात आला .सदर कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणूनकृषि सहाय्य्क धनश्री ओहळ उपस्थित होत्या. त्यांनी संगीतले की आपल्या पूर्वजांच्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, रागी, राजगिरा अशा तृण धान्याचे आहारामध्ये समावेश होता. यापासून शरीरास लागणारे महत्त्वाचे घटक प्रथिने, लोह, खनिज, तंतुमय पदार्थ जीवनसत्वे मुबलक प्रमाणात मिळत होते. तंतुमय पदार्थामुळे पोटाचे विकार, पचनाचे विकार बद्धकोष्ठता असे विकार होत नाहीत. यासाठी आहारात पौष्टिक तृणधान्याचे अनन्यसाधारण महत्त्वाचे असे प्रतिपादन यांनी व्यक्त केले जीवनसत्वामुळे आतड्यांचा आजार लहान मुलांमध्ये, गरोदर महिलांमध्ये हिमोग्लोबिन लोह यांचा स्तर वाढतो यासाठी बाजरीचे सेवन सुद्धा खूप महत्त्वाचे आहे

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →