संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त नाचणी पासून बनवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांचा प्रशिक्षण वर्ग संपन्न

दिनांक २१/०२/२०२३ रोजी ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने नाचणी,राळा, वरई, ज्वारी, बाजरी,राजगिरा इ पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी माहिती देण्यात आली तसेच कोकणातील भातानंतरचे प्रमुख पीक असलेल्या नाचणी पासून बनवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांची प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला त्यामध्ये नाचणीचे लाडू, नाचणीचे सत्व,नाचणीचे पापड,बिस्कीट,नाचणी ची वडी, चकली,इडली इ नाचणीचे प्रक्रियायुक्त पदार्थांची पाककृती प्रात्यक्षिक घेण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून राजश्री सावंत मॅडम यांनी उपस्थित महिला शेतकरी यांना प्रशिक्षण दिले सोबत आहारातील महत्त्व समजून सांगितले सदर कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते यार्ते साहेब तसेच कृषी विभागातील सर्व कृषी सहाय्यक व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमास१०० ते ११० महिला शेतकरी उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →