चिपळूण येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त पौष्टिक तृणधान्याचे स्वास्थ आहारातील महत्वाबाबत जनजागृती

दिनांक 06/01/2023 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय चिपळूण यांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त पौष्टिक तृणधान्याचे स्वास्थ आहारातील महत्वा बाबत जनजागृती करणेसाठी पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय(सभागृह) खेर्डी येथे आयोजित करण्यात आला होता .
या कार्यक्रमामध्ये मा.तालुका आरोग्य अधिकारी श्रीम. ज्योती यादव यांनी उपस्थित राहून पौष्टिक तृणधान्याचे आरोग्यातील महत्व उपस्थितांना समजऊन सांगितले. कृषी सहाय्यक श्री. जे. के. काते यांनी नाचणी व वरी लागवडी विषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले.शरदचंन्द्रजी पवार अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय येथील प्राध्यापक श्री. साळवी सर यांनी पौष्टिक तृणधान्याच्या प्रक्रिया उद्योगातील संधी व प्रक्रिया उद्योग या विषयी मार्गदर्शन केले. यानंतर रुची फूड्स च्या श्रीमती. मालप मॅडम यांनी उपस्थिताना नाचणी व वरी पासून तयार होणारे विविध पदार्थ प्रत्यक्षिकाद्वारे बनवून दाखविले.
या कार्यक्रमासाठी खेर्डी ग्रामपंचायत च्या मा.सरपंच श्रीम.अपर्णा दाते, मा. तालुका कृषी अधिकारी चिपळूण श्री. एस. डी. पवार , मंडळ कृषी अधिकारी खेर्डी श्री.एम. एम. गांधी, तसेंच सर्व कृषी पर्यवेक्षक व कृषिसाहाय्य्क उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →