मौजे वडगाव सुक्रे तालुका परभणी येथील जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम 2023

दिनांक 16 2 2023 रोजी मौजे वडगाव सुक्रे तालुका परभणी येथील जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम 2023 मोठ्या उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री लोंढे सर, मंडळ कृषी अधिकारी श्री कैलास गायकवाड कृषी पर्यवेक्षक श्री रोशन करेवार कृषी सहाय्यक श्री विनोद जोशी कृषी सहाय्यक श्रीमती एस पी खापरे जिल्हा परिषद शाळा वडगाव सुक्रे येथील समितीचे अध्यक्ष श्री अर्जुन शिंगणे तसेच उपाध्यक्ष श्री सोपान शिंगणे गावातील प्रतिष्ठित नागरिक विनायक जी भोसले आरोग्य सेविका श्रीमती प्रेम ला डोंगरे तसेच आशा वर्कर उका ताई विठ्ठल भोसले तसेच बचत गटाच्या अध्यक्ष भोसले ताई तसेच इतर बचत गटाच्या महिला शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद तसेच शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री लिंबाजी श्रीरंगसुुक्रे तसेच श्री राजेश्वर शिंगणे ,सटवाजी शिंगणे यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमांमध्ये मंडळ कृषी अधिकारी श्री गायकवाड यांनी तृणधान्यांचे आहारातील विशेष महत्त्व त्याचा मानवी आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणाम बद्दल सखोल मार्गदर्शन केले तसेच श्री विनोद जोशी कृषी सहाय्यक यांनी फास्ट फूडचा लहान मुलांचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम आणि तृणधान्यांचा होणारा फायदा त्याबद्दल विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक श्रीमती एस पी खापरे यांनी विशेष परिश्रम घेतले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →