आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत दि.17/2/2023 रॊजी मिलेट दौड/वाँक चे आयॊजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करणे अंतर्गत मिलेट दौड/वॉकचे आयोजन आज दिनांक 17 फ़ेब्रुवारी 2023 रोजी सकाळी ठीक 8.00 वाजता महाराष्ट्र शासन कृषि विभाग, सॊलापुर यांच्या वतीने करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्याचे औचित्य साधून ज्वारी, बाजरी, भगर, राजगिरा, नाचणी इत्यादी तृणधान्याचे समाजामध्ये आहारातील सेवन वाढावे यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्ह्यातील कृषी विभागाच्या वतीने मिलेट दौड/वॉकचे आयोजन केले होते.
सदर वॉकमध्ये शहरातील सिद्धेश्वर प्रशाला, सेवासदन प्रशाला, एमआयटी कॉलेज केगाव मधील सुमारे 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मिलेट वॉक शिवाजी चौक ते होम मैदान या मार्गाने काढण्यात आली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी सदर मिलेट दौड/वॉकला हिरवा झेंडा दाखवला. सोबत श्री बाळासाहेब शिंदे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर, श्री आर टी मोरे कृषी उपसंचालक, श्री जयवंत कवडे उपविभागीय कृषी अधिकारी सोलापूर, श्री मदन मुकणे प्रकल्प उपसंचालक आत्मा, श्री विवेक कुंभार कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, श्री चंद्रकांत मंगरुळे तंत्र अधिकारी सोलापूर, श्री व्ही बी दारकुंडे तंत्र अधिकारी सोलापूर, श्रीमती मनीषा मिसाळ तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापूर, श्री रामचंद्र माळी तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर हे अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय सोलापूर मधील श्रीमती आर के कलबुर्गी कृषी पर्यवेक्षक, श्री संजय बुरगुटे कृषी पर्यवेक्षक, शिवाजी सुर्वसे, लिपीक, श्री राहुल भोसले कृषी सहाय्यक, श्री नितीन माळी तंत्र सहाय्यक एन एफ एस एम, श्री सौरभ मोरे तंत्र सहाय्यक एन एफ एस एम, श्री युवराज इंगोले व कृषी विभागातील सर्व क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉक्टर श्रीमती किरण पाठक, श्रद्धा आयुर्वेदिक सेंटर सॊलापुर यांनी आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व याबाबत कार्यक्रमाच्या उद्घाटना वेळी उपस्थित विद्यार्थी अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले वॉक सुरू असताना शालेय विद्यार्थी तसेच कृषी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांनी पौष्टिक तृणधान्य चे महत्व सांगणाऱ्या घोषणा देत जनजागृती केली. मिलेट वॉकच्या अंतिम टप्प्यात होम मैदानावर जिल्हाधिकारी श्री शंभरकर साहेब यांनी उपस्थितांना संबोधित करून तृणधान्याचे आहारात प्रमाण वाढवण्याबाबत आवाहन केले. तसेच मिलेट ऑफ द मंथ या संकल्पने अंतर्गत फ़ेब्रुवारी महिना ज्वारी तृणधान्याकरीता समर्पीत असल्याने ज्वारी पिकाचे महत्व सांगणारे भित्तीपत्रकाचे व माहिती पत्रकांचे विमॊचन मा.जिल्हाधिकारी साहेबांचे हस्ते करुन उपस्थितांना त्याचे वाटप करण्यात आले. श्री बाळासाहेब शिंदे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सोलापूर यांनी उपस्थितांचे आभार मानून मिलेट दौड/ वॉकची सांगता केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर

Learn More →