मौजे चवे ता.जि.रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने रक्तदान शिबिर व चित्रकला स्पर्धेचे आयोजन

श्री रत्नेश्वर उत्सव मंडळ चवे तालुका कृषी अधिकारी कार्यालय रत्नागिरी जि रत्नागिरी व ग्रामपंचायत चवे यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 19/2/2023 रोजी पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जनजागृती कार्यशाळेचे आयोजन मौजे चवे येथे करण्यात आले होते. त्यावेळी रत्नेश्वर उत्सव मंडळाचे सर्व सदस्य, सरपंच श्री. गावणकर,ग्रामपंचायत सर्व सदस्य, तालुका कृषी अधिकारी श्री. एन. पी. भोये, मंडळ कृषी अधिकारी श्री. व्ही. एस. अवेरे कृषी पर्यवेक्षक एल. जी. मांडवकर, कृषी सहाय्यक श्रीम. रूपाली वायाळ, श्री. दिपक काळे, आत्म्याच्या बीटीएम श्रीम. हर्षला पाटील उपस्थित होते यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री भोये यांनी उपस्थित सर्वांना तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी रक्तदान शिबिर व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांचे बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शाळेचे विद्यार्थी, ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच गावातील सर्व सदस्य उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →