मौजे जांभूळ वाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे नाचणीचे प्रक्रियायुक्त पदार्थांची पाककृती याबाबत मार्गदशन

16-02-2023 रोजी मौजे जांभूळ वाडी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने नाचणी, वरई, राळा, ज्वारी, बाजरी, राजगिरा या पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी माहीती देण्यात आली तसेच कोकणातील भातानंतरचे प्रमुख पिक असलेल्या नाचणी पासून बनवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांची माहीती देण्यात आली त्यामधे नाचणीचे लाडू, नाचणीचे सत्व,नाचणीचे पापड, नाचणीची वडी, नाचणीची चकली ,नाचणी बिस्कीट, नाचणीची इडली हे नाचणीचे प्रक्रियायुक्त पदार्थांची पाककृती सांगण्यात आली. तसेच PMFME योजनेविषयी माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमास जांभूळवाडी ग्रामपंचायत सदस्य इतर महिला शेतकरी उपस्थित होते. यावेळी कृ.से. श्रीम. टाकळे, कृ.स.श्रीम. अमृतसागर व कृ.से. श्री. दोंड यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →