मा. संचालक (वि.प्र.) पुणे – यांचा सांगली दौरा – तासगावचा पौष्टिक तृणधान्य हुरडा महोत्सव पॅटर्न प्रचार प्रसिद्धीचा दिशादर्शक

  • मा.विकास पाटील साहेब संचालक कृषी आयुक्तालय पुणे महाराष्ट्र राज्य मौजे नागाव कवठे ता तासगाव जि सांगली येथे दि.18 फेब्रुवारी येथे तासगाव तालुका कृषी विभागामार्फत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 ज्वारी समर्पित महिना फेब्रुवारी हुरडा पार्टी उत्सव कार्यक्रमात मा. विकास पाटील संचालक विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले यावेळी ते म्हणाले की संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे या वर्षानिमित्त शासन स्तरावरून कृषी विभागामार्फत राज्यात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत .ज्वारी बाजरी, नाचनी, राळा ,वरई ई पौष्टीक तृणधान्य चे क्षेत्र वाढविने त्यांचे आहारातील महत्व ,पोषणमूल्ये, तृणधान्य पासून तयार केल्या जाणाऱ्या विविध पाककृती , काढणी पश्चात विविध प्रक्रिया उद्योग यांची त्यांनी विस्तृत माहिती दिली. विक्री व्यवस्था व पौष्टीक तुनधान्य ची बाजारातील मागणी वाढविनेसाठी कृषी विभागामार्फत कृषी प्रदर्शन , पाककला स्पर्धा व पौष्टिक तृणधान्य विक्री स्टॉल, मिलेट दौड , रॅली , शेत तिथे पौष्टिक तृणधान्य यासारखे विविध प्रचारप्रसिद्धी चे कार्यक्रम आयोजित केले जात असलेलेच नमूद केले , तालुका कृषी अधिकारी कार्यालय तासगाव यांचे वतीने आयोजित केलेल्या श्री बाळासाहेब पाटील व रामचंद्र पाटील यांच्या ज्वारी शेतावर आयोजित केलेल्या हुरडा पार्टी कार्यक्रमाचे त्यांनी कौतुक केले यावेळी स्वागत समारंभ वेळी खास ज्वारी कणसापासून तयार केलेला पुष्पगूच्छ खास आकर्षन चा केंद्रबिंदू ठरला. यावेळी उपस्थित शेतकरी व अधिकारी कर्मचारी यांनी ज्वारी कणसाच्या हुरडा चा व राजगिरा लाडूचा आस्वाद घेतला यावेळी श्री प्रकाश सूर्यवंशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या पौष्टिक तृणधान्य प्रचारप्रसिद्धी कार्यक्रमाची माहिती दिली.श्री सागर खटकाळे उपविभागिय कृषी अधिकारी विटा यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व आभारप्रदर्शन सर्जेराव अमृतसागर तालुका कृषी अधिकारी तासगाव यांनी केले. कार्यक्रम सुत्रसंचालन बाळासाहेब पाटील कृषी पर्यवेक्षक यांनी केले यावेळी मिलिंद कांबळे , दीपक कांबळे रवींद्र पाटील मंडळ कृषी अधिकारी, बजरंग कोरटे, सचीन दाभोळे , बी जी म्हस्के, गणपती औताडे , आर जे पाटील कृषी पयर्वेक्षक , सुनंदा मोहिते नागाव कवठेच्या कृषी सहायिका तालुक्यातील कृषी सहायक , सावर्डे ,हातनूर सावळज गावातील पाणी फाऊंडेशन चे शेतकरी गट , प्रशांत गोडबोले पाणी फऊंडेशन तालुका समनव्ययक, महिला बचत गट प्रतिनिधी व नागाव कवठे परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →