आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम मौजे वझुर खुर्द तालुका मानवत

 संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून आपण सर्व सामान्य लोकांपर्यंत पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे काय आहेत या बरोबरच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेणार आहोत. त्याअनुषंगाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे वझुर खुर्द तालुका मानवत येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमआयोजित करण्यात आला . आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत प्रत्येक कृषि सहाय्यक आपल्याकडील गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान,तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देणे यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ञ, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे असे कृषि विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या कडून आवाहन करण्यात येत आहे.

******

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →