आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 : आहारात तृणधान्यांचे प्रमाण वाढवा-तालुका कृषी अधिकारी पाथरी

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत ( National Food Security Campaign)वर्ष 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पौष्टिक तृणधान्यांची आहारातील व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने सर्व स्तरावरून प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना तालुका कृषी अधिकारी पाथरी यांनी दिल्या आहेत.मिलेट्स वापरातून मिळणारे आवश्यक पोषकांश-मिलेट्स किंवा पौष्टिक तृणधान्य/ भरडधान्य हे शरीरातील अम्लता कमी करणारे असून, ते ग्लुटेन विरहित, अत्यंत पोषक आणि पचनास सुलभ आहेत. मिलेट्सचा ग्लासेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर संतुलित राखण्याचे कार्य तृणधान्य करतात. आहारातील यांच्या वापरामुळे वजन कमी होण्यास मदतच होते. कॅल्शियम, आयर्न, झिंक, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आदी महत्त्वाची शरीरावश्यक घटक द्रव्ये याच्यातून आपल्याला मिळतात. त्याचबरोबर आवश्यक तंतूमय पदार्थ म्हणजे फायबर्स, फॉलिक सिड, विटामिन बी 6, बीटा कॅरोटीन, बी 1 आणि चेतातंतूंचे कार्य अधिक सक्षम बनविण्यास लागणारे लेसिथिन याचे उत्तम स्त्रोत म्हणजे ही तृणधान्ये किंवा मिलेट्स असतात हे सर्वांना सविस्तर मार्गदर्शनातून समजावले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →