शनिवार दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 चे अनुषंगाने जिल्हास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविणे, पौष्टिक तृणधान्या विषयी जनजागृती करणे, पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री नवनाथ कोळपकर, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ श्री डॉ.सुरेश नेमाडे, विषय विशेषज्ञ गृहविज्ञान श्रीमती भागवत मॅडम उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री जगदीश चव्हाण, वन विभागाचे अधिकारी , कृषी विभागाचे कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या दिदी उपस्थित होत्या.