कार्यशाळा
यानिमित्ताने शेतकरी प्रशिक्षण/ शेती शाळा कार्यक्रम आयोजित केला होता सदर प्रशिक्षणास सौ वैशाली साळुंखे देगाव सरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य, मानाजी निकम गावचे पोलीस पाटील देगाव विकास सोसायटीचे चेअरमन सचिन साळुंखे, कर्नल आर डी निकम सहकारी बँक संचालक श्री. जालिंदर साळुंखे उपस्थित होते त्याचप्रमाणे मा. श्री. हरिचंद्र धुमाळ तालुका कृषी अधिकारी सातारा, संग्राम पाटील सर कृषी विज्ञान केंद्र बोरगाव शास्त्रज्ञ, महेश बाबर कृषी विज्ञान केंद्र बोरगाव शास्त्रज्ञ हे देखील सदरील कार्यक्रमास उपस्थित राहून शेतकऱ्यांना बाजरी या पिकाचे आहारातील महत्व याचे मार्गदर्शन केले. तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य सन -2023 यानिमित्ताने जानेवारी महिन्यामध्ये बाजरी पिकाचे आहारातील महत्त्व हा विषय असल्याने पारंपारिक पद्धतीचे बाजरीचा खिचडा हा अल्पोपहार कार्यशाळा मध्ये उपस्थित शेतकऱ्यांना देऊन त्याबद्दल माहिती सांगून प्रचार प्रसिद्धी करण्यात आली.