नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या 353 वी पुण्यतिथी व शौर्य दिनानिमित्त IYOM बाबत जनजागृती करण्यात आली.

आज दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी मोजी उमरठ तालुका पोलादपूर येथे *नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांची 353 वी पुण्यतिथी व* *शौर्य दिनानिमित्त* विद्यमान आमदार मा.भरतशेठजी गोगावले साहेब यांनी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीस अभिवादन व वंदन करून तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर मार्फतआयोजित स्टॉलची उद्घाटन केले सोबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा. चंद्रकांत जी कळंबे साहेब उपस्थित होते उद्घाटनानंतर तालुका कृषी अधिकारी श्री एन वाय घरत साहेब यांनी त्यांचे स्वागत केले स्टॉलची *पाहणी करताना आमदार साहेब व कळंबे साहेब त्यांनी सेल्फी घेऊन तृणधान्याची शपथ घेण्यात आली तदनंतर भाषणात आमदार साहेबांनी शिवबांच्या काळात नाचणी,वरी,ज्वारी बाजरी चे अन्नखाल्ले जायचे त्यामुळे त्याची शरीरयष्टी ही उत्तम होती तीच परंपरा जपून आपल्याला तृणधान्याचे अधिक सेवन करावे लागेल व त्यामुळे आपणही रोग आजार विरहित व धष्टपुष्ट राहू असे उपस्थित वर्गांना व शेतकऱ्यांना सूचित केले* तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलादपूर मार्फत राजाराम सिताराम शिंदे फौजदारवाडी तानाजी नारायण पवार किनेश्वर सुनील विठोबा जाधव पळचिल या शेतकरी वर्गांना उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार तसेच कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, श्री नितीन धायगुडे कृषी सहाय्यक डॉक्टर मिथुन खराडे यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार आमदार साहेबांच्या हस्ते प्रदान करण्यातआला या संपूर्ण कार्यक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी श्री एन वाय घरत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी धानिवले साहेब सर्व कृषी पर्यवेक्षक सर्व कृषी सहाय्यक वरिष्ठ लिपिक श्री जगरवाल साहेब या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →