शिवाजी माध्यमिक विद्यालय वांझोळे ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी मार्गदर्शन

दि. 16-02-2023 रोजी शिवाजी माध्यमिक विद्यालय वांझोळे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने नाचणी, वरई, राळा, ज्वारी, बाजरी, राजगिरा या पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी माहीती देण्यात आली तसेच कोकणातील भातानंतरचे प्रमुख पिक असलेल्या नाचणी पासून बनवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांची माहीती देण्यात आली त्यामधे नाचणीचे लाडू, नाचणीचे सत्व,नाचणीचे पापड, नाचणीची वडी, नाचणीची चकली ,नाचणी बिस्कीट, नाचणीची इडली हे नाचणीचे प्रक्रियायुक्त पदार्थांची पाककृती सांगण्यात आली.
या कार्यक्रमास कृ.स.आर.बी.भोसले, कृ.प. देवरुख व मं. कृ.अ.देवरुख यांचेसह शाळेतील शिक्षक कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →