“आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” अंतर्गत समुद्रपूर तालुक्यामध्ये ज्वारीपासून बनविण्यात येणाऱ्या विविध पदार्थांचे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.

आज दिनांक 14/02/2023 रोज मंगळवार आत्मा अंतर्गत आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्य कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृह समुद्रपूर या ठिकाणी महिला गटांना ज्वारी पासून विविध पदार्थ बनविणे या विषयाबाबत महिला प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले . सदर प्रशिक्षण करीता मार्गदर्शक कृ.वि.के, सेलसुरा चे सहायक प्राध्यापक डॉ.प्रेरणा धुमाळ यांनी ज्वारी पासून विविध पदार्थ बनविणे या बाबत उपास्थित महीलाना कृती करुण समजावून माहिती दिले. श्री एस. डी. सुतार, तालुका कृषी अधिकारी यांनी कृषि विभागाच्या विविध योजने बाबत माहिती दिले. श्री. एम . झेड. गायधने मंडळ कृषि अधिकारी गिरड यांनी आहारातील तृण धान्याचे महत्व बाबत मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणा करीता कुषि विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील डॉ. प्रेरणा धुमाळ मॅडम यांच्या मार्फत ज्वारी चे डोसा, इडली, ढोकळा, इस्टेन डोसा ज्वारी मिक्स ई.पदार्थ बनवून माहिती देण्यात आली.सदर प्रशिक्षणात मौजा समुद्रपूर, मांडगाव, गिरड, झुणका, पाईकमारी,परडा, धुमणखेडा येथील महिलांनी सहभाग घेतला . श्री. भिंगारडे मंडळ कृषि अधिकारी समुद्रपूर, कु. प्रियंका आडे कृषि सहाय्यक, कु. भारती कृषि सहाय्यक, कु. वर्षा बाभळे कृषि सहाय्यक यांची प्रमुख उपस्थिती होती.श्री कार्यक्रमाचे आयोजन श्री आर. पी. चांदेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. वीणा दारोकर व्यवस्थापक माविम समुद्रपूर यांनी केले.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *