मत्स्य महाविद्यालय शिरगाव ता.जि रत्नागिरी येथे माविम व कृषि विभाग रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मार्गदर्शनाचे आयोजन

दि.14.02.2023 रोजी.
मत्स्य महाविद्यालय शिरगाव ता.जि रत्नागिरी येथे
महिला आर्थिक विकास महामंडळ रत्नागिरी (माविम)
नवतेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला व उद्यम विकास आणि कृषि विभाग रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने
जिल्हास्तरीय महिलांचे आरोग्य व सेंद्रिय परसबाग लागवड प्रशिक्षण
कार्यक्रमांतर्गत मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,श्रीम. कुऱ्हाडे मॅडम यांनी उपस्थित मास्टर ट्रेनर्स व सहयोगिनी महिलांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मार्गदर्शन केले. यानंतर महिलांचे आरोग्य आणि पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व याविषयी प्रश्नोत्तराचे चर्चासत्र झाले. यावेळी श्री. जगन्नाथ वानखेडकर ,जिल्हा समन्वय अधिकारी माविम रत्नागिरी, तसेच जिल्ह्यातील महिला सहयोगिनी उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 माहिती पत्रकांचे वाटप करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →