डहाणू तालुक्यातील आंबेसरी येथे आंबा व मिरची वरील कीड रोग नियंत्रण आणि पौष्टिक तृणधान्य तृणधान्य बाबत मार्गदर्शन. अदानी फाउंडेशनच्या सहकार्याने.

दिनांक 15 फेब्रुवारी रोजी आंबेसरी ग्रामपंचायत मध्ये कृषी विभाग व अदाणी फाउंडेशन त्यांचे संयुक्त विद्यमाने आंबा मोहर संरक्षण आणि पौष्टीक तृणधान्य बाबत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात आंबेसरी गांगणगाव या गावातून 50 शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उत्तम सहाने सर यांनी आंबा व मिरची पिकावरील कीडरोग नियंत्रण बाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री अनिल नरगुलवार कृषी विभागाच्या विविध योजना मध्ये सहभागी होणे साठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन केले. हे वर्ष पौष्टिक तृणधान्य म्हणून साजरा करावयाचा आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने ज्वारी,बाजरी, नागली, वरी पासून बनवलेले अन्नपदार्थाचा वापर रोजच्या आहारात करावा. जेणेकरून आपण निरोगी राहू. अदानी फाउंडेशनचे असिस्टंट मॅनेजर श्री अविनाश पाठक यांनी कृषी विभाग व वेगवेगळ्या संस्था यांचे माध्यमातून शेतकऱ्यांनी आपला विकास साधून घ्यावा असे आवाहन केले. आत्माचे तालुका समन्वयक श्री वाडीले यांनी विविध गटामार्फत शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येईल. तसेच पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आणि शेतकरी कंपनी कसे बनवावे याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाकडे वळावे याबाबत देखील त्यांनी माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी डहाणू श्री जगदीश पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य म्हणजे काय. आपण पूर्वापार पासून लागवड करीत असलेलं नाचणी, वरी हेच आता पौष्टीक तृणधान्य म्हणून आपल्या आहारात वाढवावे लागेल. नाचणीची आंबील रोज पिणाऱ्या शेतकऱ्याची हाड मजबूत असतात. तसेच तो कोणत्याही आजाराला लवकर बळी पडत नाही. आपल्या रोजच्या आहारात भात आणि गहू यापासून बनवलेले अन्नपदार्थ असतात. त्याच्या सेवनाने आपल्याला विविध आजारांना बळी पडावे लागते. रोजच्या आहारात जर आपण ज्वारी, बाजरी, नागली,वरी यापासून बनवलेले अन्नपदार्थाचा वापर केला तर आपण डॉक्टर पासून चार हात लांब राहू. आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आपल्या हाती आहे. म्हणून सर्वांनी पौष्टिक तरुण धान्याची कास धरावी असे आवाहन केले. याव्यतिरिक्त कृषी विभागाच्या विविध योजना बाबत माहिती दिली. मग्रारोहयोअंतर्गत बांधबंधिस्ती, फळबाग लागवड, शेततळे, ठिबक सिंचन, तसेच शेतकरी अपघात विमा याबाबत मार्गदर्शन केले.

पौष्टीक तृणधान्य आहारात खाणार म्हणुन शपथ

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →