मा. विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे यांनी दिली रायगड जिल्हा कृषी महोत्सव आज भेट.महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा कृषी महोत्सव 2023 चे आयोजन 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत सेक्टर 27, कामोठे, पनवेल येथे करण्यात आले आहे, तरी सदर कृषी महोत्सवास मा विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.आज दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी मा. विभागीय कृषी सहसंचालक यांनी रायगड जिल्हा कृषी महोत्सव 2023 कामोठे,नवी मुंबई येथे भेट दिली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रायगड मा. उज्वला बाणखेले यांनी साहेबांचे स्वागत करून कृषी विभागाच्या दालनामधील जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण कृषी उत्पादनाच्या नमुन्या बाबत महिती दिली, त्याच बरोबर विभागाने केलेले जलकुंड, SRT, पॉलिहाऊस यांचे मॉडेल्स यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागांनी तयार केलेल्या पौष्टिक तृणधान्य दालनातील कृषीविभागाच्या रायगड जिल्ह्यातील महिला अधिकारी कर्मचारी यांनी तयार करून आणलेल्या पौष्टिक तृणधान्यांच्या विविध पक्वान स्टॉलला भेट देऊन मा. कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे यांच्या हस्ते पौष्टिक तृणधान्य पासून बनवलेला धान्याचा केक कापून स्वागत करण्यात आले,या वेळी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी तयार करण्यात आलेले क्यूआर कोड बाबत माहिती साहेबांना देण्यात आली, त्याचबरोबर मा.JDA साहेब यांनी सर्व स्टॉलची पाहणी करत शेतकरी व महिला बचत गटातील सदस्यांना मार्गदर्शन केले. विद्यापीठ ,संलग्न विभाग, पी.एम.एफ.एम.एम.ई चे लाभार्थी त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी उद्योजक , सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी, वैयक्तिक शेतकरी त्याचप्रमाणे एम.एस.आर.एल.एम. आणि माविम यांच्या लाभार्थ्यांचे स्टॉल त्याचप्रमाणे कृषी निविष्ठा, कृषी अवजारे यांचा भात शेती,आंबा पीक पद्धतीमध्ये होणारा सहभाग याबाबत सहभागी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली आणि माहिती घेतली. तसेच कृषीपूर्वक लघुउद्योग वाढवण्यासाठी कृषी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. मा. विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाणखेले मॅडम अणि रायगड टीम यांचे कृषी महोत्सवाबाबत अभिनंदन करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री बाबत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मार्केट व दरा बाबत समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.