मा. विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे यांनी रायगड जिल्हा कृषी महोत्सवातील आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य दालनात दिली भेट.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन सेक्टर नंबर 27 कामोठे पनवेल येथे करण्यात आले आहे, तरी सदर कृषी महोत्सवात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 बाबत जनजागृती करण्याकरिता स्वतंत्र आंतरराष्ट्रीय पोषक तृणधान्य दालन उभारण्यात आले असून शहरातील लोकांना आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन केले जात आहे, तसेच पौष्टिक तृणधान्याचे विविध पकवान प्रदर्शनात ठेवून मार्गदर्शन व प्रचार करण्यात येत आहे. या दालनास आज मा. विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे यांनी भेट दिली यावेळी पौष्टिक तरुण धान्यापासून बनलेल्या केक कापून त्यांचे स्वागत करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →