पाैष्टीक तृणधान्य च‍ित्ररथाचे जव्हार तालुक्यात साखरशेत गावी स्वागत

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त साखरशेत मधील चालतवड येथे तृणधान्य रथाचे आगमन झाले त्याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी यांना तृणधान्य म्हणजेच नागली व वरी या अन्नधान्यांचा आहारात समावेश करणे बाबत मंडळ कृषी अधिकारी श्री जे बी गावित व कृषी पर्यवेक्षक श्री जे.एम. बोर्डे यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली सर्वांनी ती प्रतिज्ञा मान्य करत ग्वाही दिली की यापुढे आठवड्यातील किमान तीन दिवस आम्ही आमच्या आहारात नागली व वरी च्या पदार्थांचा समावेश करू प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य श्री सुधीर धुळे व इतर सदस्य उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →