मौजे टेरव ता.चिपळुण जि.रत्नागिरी येथे पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रमाचे आयोजन

 दिनांक 13/02/2023 रोजी मौजे टेरव ता.चिपळुण जि.रत्नागिरी येथे पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणुन मंडळ कृषि अधिकारी श्री मनोज गांधी साहेब तसेच कृषी पर्यवेक्षक श्री संतोष भोसले साहेब हजर होते यावेळी गावातील महिला शेतकरी हजर होत्या. पौष्टीक तृणधान्य चे आहरातील महत्व व जास्तीत जास्त आहारामध्ये त्याचे सेवन कसे होईल तसेच खरीप हंगामामध्ये नाचणी वरी यांचे शेत्र कसे वाढेल याबाबत सविस्तर मार्गदर्शन गांधी साहेबांनी  केले. तसेच PMFME योजना सविस्तर मार्गदर्शन भोसले साहेब यांनी केले यावेळी 50 महिला शेतकरी हजर होत्या. सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक संतोष जाधव यांनी केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →