माननीय सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी यांच्या वतीने माननीय रत्नागिरी जिल्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्याचा रोजगार व स्वयंरोजगार मेळावा दिनांक 12 .2. 2023 रोजी रा. भा शिर्के प्रशालेच्या मैदानात आयोजित करण्यात आला सदर मेळाव्यात कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे अवचित्याने कृषि विभागाचे विविध योजनांची स्टॉलची मांडणी करण्यात आली सदर स्टॉलला दिवसभरात 243 शेतकऱ्यांनी भेटी दिल्यात व कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती घेतली यावेळी कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी रत्नागिरी श्री .एन .पी .भोये ,कृषि अधिकारी श्री. विध्याधर वैद्य , श्रीमती. हर्षला पाटील बीटीम (आत्मा) उपस्थित होते