आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मौजे बेंडकाळ तालुका लोहारा येथे मार्गदर्शन सभा घेण्यात आली.यावेळी गावाचे सरपंच श्री आनंद गोरे,ग्रामसेवक श्री दबडे, स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेचे श्रीमती तब्बसुम,श्रीमती सरिता तसेच गावातील 50 महिला उपस्थित होत्या.या कार्यक्रमाप्रसंगी कृषी सहाय्यक श्री शैलेश जट्टे यांनी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्य ओळख व आहारातील महत्व याविषयी माहिती दिली व पौष्टिक तृणधान्य सेवणाची शपथ देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.