दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे मिरखेल येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग च्या सौजन्याने तालुका कृषी अधिकारी,परभणी श्री काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सदरील कार्यक्रमास जिल्हा सल्लागार (कृषि विभाग ) डॉ. हर्षा कौसडीकर मॅडम ह्या प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या. सदरील कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी श्री संघई सर ,कृषी पर्यवेक्षक श्रीमती वैशाली कदम मॅडम, तसेच कृषी सहाय्यक वंदना बेद्रे या उपस्थित होत्या. आणि या कार्यक्रमांमध्ये गावातील सर्व महिलांनी पाककला स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला . पौष्टिक तृणधान्याचे आपल्या आहारातील महत्त्व डॉ. हर्षा मॅडम यांनी सर्व महिलांना सांगितले.या स्पर्धेत महिलांना प्रोत्साहन पर पहिले दुसरे व तिसरे असे पारितोषिक सुद्धा देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ शिल्पा देशमुख मीरखेल यांनी अथक परिश्रम घेतले.