आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन

आज दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे कल्याण तालुका हवेली जिल्हा पुणे येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ज्वारी तृणधान्य पासून विविध पदार्थ बनवून पाककला स्पर्धांत एकुण १९ महिलांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धे मध्ये पदार्थ निहाय गुणांक देऊन त्यातून प्रथम तीन क्रमांक तसेच उत्तेजनार्थ ३ अशा स्पर्धकांना मा. तालुका कृषि अधिकारी हवेली यांचे स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र हवेली मंडळ कृषि अधिकारी यांचे हस्ते वितरण करण्यात आले. सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकामाधून गुणांकंनुसार निवडीसाठी निरीक्षक म्हणून श्री. अमोल ढवळे, कृषि पर्यवेक्षक मोशी मंडळ व वाघोळी मंडळ कृषि अधिकारी श्री गणेश सुरवसे यांनी जबाबदारी पार पाडली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक श्री छगन कोकणी यांनी केले तसेच हवेली मंडळ कृषि अधिकारी श्री शिवाजी खटके यांनी पौष्टिक तृणधान्य चे मानवी आरोग्यासाठी चे महत्व बद्दल माहिती दिली. श्री अमोल ढवळे यांनी प्रधानमंत्री मंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया ऊद्योग योजने विषयी सविस्तर माहिती देऊन शेतकरी महिलांनी प्रक्रिया ऊद्योजक व्हा असा मंत्र दिला. श्री गणेश सुरवसे यांनी कृषि विभागाच्या विविध योजना तसेच विषमुक्त शेती विषयक माहिती दिली. श्री कादबाने यांनी ज्वारी पिकापासून तयार होणार्या विवीध पदार्थांबाबत मार्गदर्शन केले व आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमास गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ईतर मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →