पौष्टिक तृणधान्य चित्ररथाचा तलासरी तहसील कार्यालयात जंगी स्वागत.

तलासरी

दि. १०/२/२०२३ रोजी तलासरी तालुक्यात चित्ररथाचे सकाळी १०.३० वाजता तहसीलदार कार्यालय तलासरी येथे आगमन झाले.

चित्र रथाचे श्री. गालीपिल्ले तहसीलदार, तलासरी यांच्या हस्ते पुष्पहार, श्रीफळ, वाहून उद्घाटन करण्यात आले.

चित्र रथाचे टप्पे व उद्देश उत्पादन, उत्पादकता वाढ, प्रक्रिया सुविधा, बाजार व्यवस्था, पुरवठा साखळी निर्मिती, शेतकऱ्यांच्या निव्वळ उत्पादनात वाढ, आहार जनजागृती करून मागणीत वाढ करणे आणि निर्यातीचे प्रयत्न करणे तसेच तृणधान्याचे भविष्यातील टप्पे व उद्देश याबाबत माहिती राहुल वळवी कृषि सहाय्यक, वडवली यांनी दिली.

तहसीलदार, तलासरी व भरत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, तलासरी यांनी रथाला हिरवा झेंडा दाखविला. तहसीलदार कार्यालयापासून रथाला सुरूवात करण्यात आली.

काशिराम वसावे तालुका कृषि अधिकारी तलासरी यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी बाजारपेठेत चित्र रथाच्या माध्यमातून प्रचार प्रसिध्दी करण्यात आली. प्रचार प्रसिध्दी मध्ये तृणधान्याचे आरोग्यासाठी आहारात महत्व याबाबत घोषवाक्याचा उपयोग करण्यात आला.

मनोहर गावड व संजय जगताप
कृषि पर्यवेक्षक, तलासरी व वरवाडा यांच्या सजेतील गावात चित्र रथ फिरविण्याचे नियोजन सुनिल बोरसे मंडळ कृषि अधिकारी तलासरी यांनी केले.

चित्र त्यासोबत कृषि सहाय्यक काव्या पाटील, पुष्पा दिवे, रमेश शिंगडा, रमेश भुसारा, प्रितेश घाटाळ, प्रकाश थापड, भुषण पगारे, लक्ष्मण भोये, यशवंत कडू, प्रविण खेवरा यांनी सहभाग घेतला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →