पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात प्रचार प्रसिद्धीसाठी स्टॉलचे उद्घाटन झरी येथे करण्यात आले

*झरी (तलासरी)**दि. ९ फेब्रुवारी २०२३*आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे २०२३ निमित्ताने झरी येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत प्रचार व प्रसिध्दीसाठी स्टाॅल उभारण्यात आला. झरी हे गाव साप्ताहिक बाजारपेठ असून दर गुरुवारी बाजूच्या परिसरात ५ ते ६ गावाचा समावेश आहे. याचे औचित्य साधून स्थानिक आदिवासी बांधवांना पौष्टिक तृणधान्याचे महत्व समजण्यासाठी चालना मिळेल. आहारातील बदलत्या शैलीमुळे आहारात तृणधान्ये वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तृणधान्याचा आहारात समावेश केल्याने आरोग्यदायी ठरणार आहे. तृणधान्यापासून भाकरी, डोसा, उपमा, लाडू, खीर, नाचणी पासून सत्व, नागली पापड यासारखे पदार्थ तयार करता येतील. यामुळे येणाऱ्या भावी पिढीला वरदान ठरणार आहे. या स्टाॅलचे उद्घाटन मीना ठाकरे सरपंच, यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनाचे वेळी अरविंद भावर, उपसरपंच आदि सदस्य, तसेच काशिराम वसावे, तालुका कृषि अधिकारी, तलासरी, राजाभाऊ निपसे कृषि अधिकारी पंचायत समिती तलासरी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक उपस्थित होते.——————————————सुनिल काशिनाथ बोरसेमंडळ कृषि अधिकारी, तलासरी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →