आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सातारा येथे महिला मेळावा , पाककला स्पर्धा 

दि. २५/१/२०२३ जिल्हा सातारा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सातारा येथे महिला मेळावा , पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.  या कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यामधील सर्व कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग होता.  या  कार्यक्रमास  प्रमुख वक्ते डॉ. प्रियदर्शनी देशमुख यांचे पौष्टिक तृणधान्य ही काळाची गरज याबाबत व्याख्यान आयोजित केलेले होते. तृणधान्याचे आहारामध्ये महत्व वाढवण्यासाठी सदर कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांना हळदीकुंकू व वान म्हणून ज्वारी बाजरी नाचणी या धान्याचे वाटप करण्यात आले. व नाश्ता म्हणून पौष्टिक तृणधान्य वापरून बनवलेले थालीपीठ यांचा नाश्ता कार्यक्रमांमध्ये वाटप करण्यात आला. सदर कार्यक्रमास  जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय श्री विजयकुमार राऊत,  श्री संतोष कुमार बरकडे तंत्र अधिकारी,  श्री रमेश देशमुख तालुका कृषी अधिकारी जावळी, श्रीमती सितल करंजेकर, लेखाधिकारी, श्री अनिल महामुलकर कृषी अधिकारी तथा नोडल अधिकारी, प्रमोद गाढवे कृषी सहाय्यक, पवन जाधव  तंत्र सहाय्यक राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान   , स्वाती पवार, निशिगंधा माने, अंजली ननावरे व सुप्रिया महाडिक तंत्र सहाय्यक राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, मुक्ता वाघमारे आधी उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमास कार्यालयामधील सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमांमध्ये पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अंकुश सोनावले कृषी सहाय्यक यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →