बुधवार दि. 08/02/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्ताने शासकीय आश्रम शाळा वार्सा तालुका साक्री येथे पौष्टिक तृणधान्य चे आहारातील महत्त्व याविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी पिंपळनेर तानाजी सदगीर, कृषी पर्यवेक्षक शिवाजी राऊत पी बी महाले व पिंपळनेर मंडळातील कृषी विभागाची सर्वच टीम, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि कर्मचारी रुंद उपस्थित होते.