मोरवणे ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन

दिनांक 1 मार्च 2023 रोजी मोरवणे ता.चिपळूण जि.रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं.
या स्पर्धेमध्ये नाचणी,वरी , बाजरी , ज्वारी पिकापासून पदार्थ बनवणे हा विषय ठेवण्यात आला होता. या स्पर्धेला २३ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .या स्पर्धकांनी थालीपीठ , शंकरपाळी , केक , मोदक ,हराभरा, बिस्कीट , खीर , इडली, भाकरी , आप्पे ,इत्यादी पदार्थ प्रदर्शनात ठेवले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन तालुका कृषी अधिकारी शाहू पवार यांच्या हस्ते करण्यात आले . तसेच भरडधान्याच्या पाककला प्रात्यक्षिक मालप मॅडम यांनी करून दाखविले .यावेळी मंडळ कृषी अधिकारी मनोज गांधी, कृषि पर्यवेक्षक संतोष भोसले मोरवणे गावच्या सरपंच श्रीमती संचिता जाधव. तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ सुप्रिया मोरे ,सौ श्रुष्टी शिंदे,आत्मा समितीचे सदस्य श्री सुरेंद्र शिंदे व कृषी सहाय्यक – जे.के काते, कविता चव्हाण , प्रभात योग्यता विकास केंद्राचे श्री . वसीम मुकादम व शेतकरी महिला उपस्थित होत्या. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास पैठणी, द्वितीय क्रमांकास साडी ,तृतीय क्रमांकास साडी व सर्व स्पर्धकांना सहभाग घेतल्याबद्दल प्रमाणपत्र महिला दिनाच्या दिवशी देण्यात येणार आहे.
बक्षिसाचा भार प्रभात योग्यता विकास केंद्र ,लोटे खेड यांनी स्विकारला आहे .
या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन कृषि सहायीका रेश्मा दडस यांनी केले होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →